2 comments

नागनाथ पाराचा इतिहास

"पूर्वी एखाद्या अपराध्यास हत्तीच्या पायी देवून मारायचे ,हे तुला माहित आहे ?" .. नंदुजी फडकेंनी मला विचारले . 
"हो ,ऐकलेय मी "
"पण हत्तीच्या पायी देणे ,म्हणजे कसे .. माहित आहे तुला ?" नाही ? सांगतो" ... 

"तुला पुण्यातले शनिपार आणी तेथून अवघ्या शंभर ते सव्वाशे मीटर अंतरावर असलेले नागनाथपार माहित असेलच .... 



तिसऱ्या पानिपतच्या युद्धात हार झाली .. प्रचंड वाताहात झाली अनेक मराठे मारले गेले ,
.. सव्वा लाख बांगडी फुटली .. इतुक्या विधवा जाहल्या .. अंदाधुंद माजली, कोणी कोठे .. समजेनासे जाहले ..
मराठयांचा सरसेनापती .. सदाशिवराव भाऊ गायब जाहला ,थांगपत्ता नाही काही .. जे वाचले.. ते विखुरले,
जीवाच्या भीतीने,इकडे तिकडे ..

अंगास राख फासून नाना फडणवीस पुण्यास परतले .. बिघडलेली राज्याची घडी सावरणे ऐसेच चालू होते ..

अचानक तो आला ..होय तो पुण्यास आला .. सद्शिवराव ... खरा नव्हे खोटा .. अगदी हुबेहूब तसा दिसणारा ... तोतया सदाशिवराव !
मी सदाशिवराव ऐसे तो सांगू लागला .सारे स्तब्ध .. काय हा प्रकार ?हातीपायी धड असा हा आला ?.. पण फडणवीस ..... त्यांना शंका आली .. कोण हा ?याचे वर्तन वेगळे दिसते .. नाही ... नाही .. पहिली याच्या सत्यतेचि शहानिशा व्हावी ऐसा त्यांचा प्रस्ताव .. अर्थात काही आपमतलबी मंडळींना तो रुचला नाही पण शेवटी नानांनी आदेश दिधला .. बस .. याची परीक्षा ही अटळ .. अधिक बोलणे नाही..पण  कैसी घ्यावी याची परीक्षा ?कसे ओळखावे यास ? नानांना सुचले .. सदाशिव भाऊची पत्नी .. होय.. तीच सांगू शकेल हा खरा की खोटा ..
नानांनी तिच्या समोर प्रस्ताव मांडीला ... एकांती तिने यास काही प्रश्न विचारावीत ,आणी याने त्याची उत्तरे द्यावीत दालनात एक पडदा असेल आणी त्याआड नाना समक्ष हजर राहून सारे ऐकतील ... होय ठरले मग ...
तैसी व्यवस्था जाहली '

झाले .. पडताळणी सुरु जाहली .. एक दालन .. पडदे .. तीन भाग अलग अलग ... एका भागात स्वतः नाना .. तीचे प्रश्न सुरु ,'अहो ऐकले का ?.. आपण त्या दिवशी गणपतीला गेलो होतो ,त्यावेळी तुम्ही मला एक वाचन दिले 'सांगा बरे कोणते ?' साधा प्रश्न ... काय उत्तर देणार ?घशास कोरड पडली याच्या .. काही सुचेना .. ततपप करू लागला
नानांना समजले की याचा अवतार संपला .. 'घेऊन जारे या भामट्यास .. फटके द्या याला '...

अंगावर फटके बसताच तो कबूल झाला ,बोलला.. मी खोटा सदाशिवराव .. माफी असावी ,अभय द्यावे .. माफी ?.. अभय ?? चांडाळा अरे हरामखोरा.. तुला एकच शिक्षा ... देहांत शासन ... !
हो.. ययाला हत्तीच्या पायी ... देहांत शासन !!!

शनिपार पाशी त्याला आणण्यात आले .. हत्तीच्या चारी पायात साखळीत मधे याला बांधले , हत्ती चालू लागला .. हत्तीसोबत याची फरपट . कधी हत्तीचा मागचा पाय अंगावर ,कधी पुढचा ..
मरण यातना ,रक्तबंबाळ अवस्थेतला यातनामय प्रवास.. पुढच्या पारापाशी संपला ,इथे त्याचा जीव गेला हत्ती थांबला त्या पारापाशी .. शनिपार पासून अवघ्या काही अंतरावर ..

या पारास नागनाथ पार म्हणतात .. कारण .. या तोतया सदाशिव भाऊचे .. खरे नाव होते .. नागनाथ !!!


- रणजीत राणे  

2 comments:

  1. अहो तो फोटो शनिपाराचा लावलाय.

    ReplyDelete
  2. हतोतयाचे नाव नागनाथ नव्हते.

    ReplyDelete

 
Toggle Footer
Top