0 comments

Oct 12 - Nov 30: 'Modi Lipi' Workshop

शिवरायांनी घडविलेल्या इतिहासाचे साक्षीदार जागोजागी विखुरले आहेत. हे साक्षीदार सरदार-संस्थानिकांच्या दफ्तरांतील मोडी कागदपत्रांत दडले आहेत. मोडी लिपीच्या अभ्यासाशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करणे केवळ अशक्य!!!
मोडी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची प्रमुख लेखनपद्धती होती. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि देवनागरी लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून ऐतिहासिक संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते. यासाठीच "मराठी हितवर्धिनी सभा" आपल्यासाठी घेऊन येत आहे "मोडी लिपी कार्यशाळा". मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि शिवरायांच्या इतिहासाचे जाणकार व्हा!!!

0 comments:

Post a Comment

 
Toggle Footer
Top