0 comments

फिटे अतिक्रमणाचे जाळे..

२५ सप्टेंबर , २०१३ 

झाले मोकळे.. दिसे .. मैदान …. काल सकाळी फिरत असताना मंडई पाशी आलो 

महात्मा फुले मंडई ,पुणे .
काय सांगू मित्रानो ,तेथेच थबकलो. डोळ्यावर विश्वासच बसेना माझ्या… काय पाहतोय मी हे?
हि मंडई आहे ? अशी ?.. समोर अगदी मोकळे मैदान ??
कोणता काळात आहोत आपण ? १९५०-१९६० मध्ये वावरतोय की काय असा भास होऊ लागला मला .. इतके मोकळे मोकळे?. मोठ्या वाहनांच्या ऐवजी निवांत सायकल उभी करून अगदी शांतपणे वर्तमानपत्र वाचणारा एक सायकलस्वार दिसत होता. आजच्या काळात हे असे दृश्य?.. कमाल झाली !
मंडईची हि एक ऐतिहासिक वस्तु.... खरोखर सांगतो ,माझ्या लाइफ मध्ये हि ऐतिहासिक वस्तू संपूर्ण अशी मी पहिल्यांदाच बघत होतो.
म्हणजे,कधी उजवा भाग..कधी डावा ..कधी वरचा ..अतिक्रमणात लपलेला. म्हणजे त्यातून दिसेल तो भाग म्हणजे ऐतिहासिक मंडई ची वस्तु म्हणजे ,हे असेच काहीतरी असावे .. एवढेच माहित होते .
एक ऐतिहासिक कलाकृती... साक्षात डोळ्यासमोर ... थक्क होऊन पाहत उभा होतो मी…………!!!
"काय ?.. चकीत झालास ना ?".. मी बाजूला पहिले,.. एक सद्गृहस्थ. पांढरा शुभ्र झब्बा.
साधारण पंचाहत्तर वर्षाचे असावेत ते. त्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य... मी गोंधळलेला.
"अरे ,माझे पण तसेच झाले,अगदी तुझ्यासारखे. थोडे जास्तच म्हण. पण आज मला माझे लहानपण दिसले रे. परत.
शाळेतले दिवस दिसले मला,अशीच होती मंडई तेव्हा. तू नाही पाहिलीस. पण मी पाहिलीय तेव्हाची .. अगदी अशीच दिसायची तेव्हा . ते मोकळे मैदान .... "
"हो ना खूप दुकाने होती काल परवापर्यंत येथे. महपलिकेचे अतिक्रमण विभाग कारवाई करतेय हे समझले होते पण नोकरीच्या कामात बिझी होतो त्यामुळे काही समझले नाही. आता बघतोय काय झालेय ते.. मैदानाचे डांबरीकरण पण केलेले दिसतेय .भलतेच वेगळे दिसतेय सारे" मी म्हणालो
ते हसले,.. "तुला एक सांगू ?.. मला आता असे वाटतेय ,मी .. खूप लहान झालोय .. नऊ -दहा वर्षांचा..आत्ता या क्षणी ना ,माझ्या पाठीवर माझे दफ्तर आहे. दफ्तरात माझा पितळेचा डबा . डब्यात आई ने दिलेत शेंगदाण्याचे लाडू,गुळ खोबरे .. कधी काजू तर कधी बदाम " ..ते हरवले .. होते .. त्यांच्या भूतकाळात. मी समोर बघत होतो .. ती ऐतिहासिक वस्तु .. समोरचे ते मोकळे मैदान .. आयुष्यात प्रथमच.
भानावर आलो .. पहिले .. ते निघून गेल होते ....
लतादीदींचे एक गीत माझ्या मनात गुणगुण करत होते ..
'या चिमण्यांनो .. परत फिरा .. रे …..
घराकडे आपुल्या .....

रणजीत राणे

0 comments:

Post a Comment

 
Toggle Footer
Top